पुणे : एनएसई कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंगप्रकरणी सीबीआय आणि ईडी या दोघांनी संजय पांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज ईडीकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे.
पांडे हे ३० जून रोजी निवृत्त झाले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून चार महिन्यांच्या कारकिर्दीपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी डीजीपी म्हणूनही पदभार स्वीकारला होता.एनएसई कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंगप्रकरणी सीबीआय आणि ईडी या दोघांनी संजय पांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला ‘को-लोकेशन’ घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशीही केली होती.
सीबीआयने सोमवारी सांगितले की, महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपावरून पांडे आणि मुंबईचे आणखी एक माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी केली आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंग आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे मंगळवारी दुसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. या प्रकरणी निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची ईडीकडून दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली.
सोमवारप्रमाणेच संजय पांडे यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या सिक्युरिटी ऑडिटबाबत चौकशी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पांडे यांची त्यांच्या कंपनीच्या व्यवसाय आणि कामकाजाबाबत चौकशी करण्यात येणार आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत त्यांचे बयान नोंदवले जाईल, असेही सांगण्यात येत होते.
दरम्यान,(ईडी) ने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. एनएसईला लोकेशन प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णन या को लोकेशन प्रकरणात मुख्य आरोपी आहेत.