लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील ओशो अपार्टमेंटमधील फ्लॅटचा अनाधिकृतपणे घरात घुसून ताबा घेण्याच्या घटनेला सहा दिवस उलटून गेले आहेत. तरीही आरोपींना अद्याप अटक झाली नाही. यातील आरोपी परदेशात जाण्याची शक्यता असल्याने आरोपींना अटक करावी अशी मागणी फिर्यादी अन्वर हुसेन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की दि.१८ फेब्रुवारी रोजी स्मृति सिराज गोवानी (भट), भारती जोधिया, हुसेन माला, हितेश भंडारी सर्वजण राहणार पांचगणी अशा चार जणांनी संगनमताने सकाळी १० ते ३ या वेळेत फिर्यादी राहत असलेल्या फ्लॅट नंबर २०३ व २०४ चा अनाधिकृतपणे घरात प्रवेश केला. त्यानंतर या गुन्हेगारी टोळीने घर फोडण्याचे सुरक्षितपणे ठेवलेल्या सर्व महत्त्वाच्या फाईल्स त्यांनी अवघ्या ५ मिनिटांत बाहेर काढल्या.
ती कागदपत्रे मूळ स्वरूपात आहेत आणि राज्य-केंद्र सरकार आणि वक्फ यांच्या मालकीची आहेत. सदर इसम घटनेवेळी सतत फोनवर असायचे आणि कोणाच्या तरी सूचनेनुसार ते काम करत असल्याची शक्यता आहे. सदर इसमांचे मोबाईल कॉल्स तपासून त्यामागे कोण आहे. याची पोलीसांनी माहिती घ्यावी.
हा गुन्हा चोरीचा नसून दरोडा, खंडणी व खुनाचा प्रयत्न म्हणून घडला आहे. या गुन्ह्याचे सीसीटीव्ही रेकाॅरडींग झाले आहे. हा संघटित गुन्हा मकोका अंतर्गत येतो. सदर आरोपींवर कलम ३९१, ३९८, ३९९, गुंड कायदा २(b) आणि २(c) आणि मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.