पुणे : कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गज्या मारणेच्या टोळीतील कोल्हापुरातील डॉक्टर साथीदाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट सहाने मध्यप्रदेशातील इंदूरमधून ताब्यात घेतले आहे.
डॉ. प्रकाश बांदिवडेकर (रा. चंदगड, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कात्रज भागातून एका शेअर दलालाचे गजा मारणे टोळीने अपहरण केले होते. २० कोटींच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण करण्यात आले होते. खंडणीप्रकरणी पुणे पोलीस तपास करत असताना त्यांना कोल्हापुरातील चंदीगड परिसरातील डॉ. बांदिवडेकर याचा या अपहणाशी थेट संबंध असल्याचे कळाले होते.
बांदिवडेकर हे पेशाने डॉक्टर असले तरी त्यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. बांदिवडेकर यांना शेअर दलाल अपहरण प्रकरणात आपल्याला अटक होणार असल्याची कुणकुण लागल्याने तो फरार झाले होता. मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाने मध्यप्रदेशातील इंदूरमधून त्यांना अटक केली आहे. डॉ. बांदिवडेकर सराईत गुन्हेगार असून गेल्या काही वर्षांपासून फरार होता. त्याच्या विरोधात कोल्हापूर मधील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत खून, खंडणी असे दहा ते बारा गंभीर गुन्हे दाखल आहेत. कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणेचा साथीदार असलेल्या डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर याचा शेअर दलालाच्या अपहरणात सहभाग असल्याचे उघडकीस आले होते.
दरम्यान, या अपहरण प्रकरणी पुणे पोलिसांच्या पथकाने बांदिवडेकर याला इंदूरमधून अटक आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ सहपोलीस आयुक्त गुप्ता, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे.