कडा : कोंबड्याच्या शेडमध्ये तब्बल ६० किलो गांजा ठेवणाऱ्या एका तस्कराला आष्टी पोलिसांनी भवरवाडी येथून सोमवारी (ता.१२) दुपारच्या सुमारास ठोकल्या बेड्या आहेत. हौसराव भवर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हौसराव भवर याने गोण्यात भरून विक्रीसाठी गांजा भवरवाडी येथील कोंबड्याच्या शेडमध्ये गांजा ठेवला आहे. अशी माहिती आष्टी पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर शेडवर धाड टाकली. यावेळी त्या ठिकाणी पोलिसांनी ६ लाख रुपयांचा तब्बल ५९ किलो गांजा जप्त केला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलिस नाईक प्रवीण क्षीरसागर, अमोल ढवळे, सचिन पवळ, संतोष नाईकवाडे आणि बबरूवान वाणी यांच्या पथकाने केली आहे.