पुणे : चाकण पोलिसांनी एक-दोन नव्हे तर तब्बल २५ चोरीच्या दुचाकी जप्त करून तीन चोरट्यांना अटक केली आहे.
अशोक सोनावणे, फारुख अन्सार, योगेश वंबाटे अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल सुमारे १२ लाख ५० हजाराच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी नागरिकांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या.यामुळे परिसरात बाईक चोरांची दहशत पसरली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली होती.
चाकण पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना रात्री दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २५ दुचाकीसह तब्बल सुमारे १२ लाख ५० हजाराच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी नेमक्या कशा दुचाकी चोरल्या, तसेच दुचाकी चोरांच्या या टोळीत त्यांचे अजूनही काही साथीदार आहेत का, या अनुशंगानेही पोलिसांकडून तपास केला जातोय. तसेच दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी केलेल्या या कारवाईन बाईकचोरांचे धाबं दणाणले आहे.