उरुळी कांचन (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस ठाण्याच्या समोरील दिपक हार्डवेअरचे मालक निखिल शंकर पंजवाणी(वय-२३) यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. १४) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल पंजवाणी यांचे उरुळी कांचन येथील पोलीस ठाण्याच्या समोर दीपक हार्डवेअर नावाने दुकान आहे. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निखिल याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
निखिल ने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.
दरम्यान, या घटनेने उरुळी कांचनसह परिसरात एकच खळबळ उडाली असून निखिलने आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसूनआत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.