पुणे : अंमली पदार्थांची विक्री करणा-या दोघांना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी पांडवनगर, पुणे येथून ताब्यात घेतले आहे.
विराज इंद्रकांत छाडवा (वय-३२, रा. हेल्थ कॅम्प मित्र मंडळ जवळ, पांडवनगर, पुणे), जयेश भारत कोटियाना (वय-२० रा. तिरुपती लॉन्स, टिंगरेनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २ लाख १० हजार ९५० रूपये किंमतीचे ६ ग्रॅम ९३० मिली ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ, दोन मोबाईल, स्वयंचलित बॅटरी वरील वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट ६ चे पथकातील अधिकारी व अंमलदार पुणे परिसरात गस्त घालीत होते. यावेळी एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, हेल्थ कॅम्प मित्र मंडळ जवळ, पांडवनगर, पुणे येथे दोन इसम संशयित रित्या उभे असुन त्यांचेजवळ एम.डी नावाचे अंमली पदार्थ असुन ते विक्री करीत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी स्वतः पोलीस पथकासह हेल्थ कॅम्प मित्र मंडळ जवळ, पांडवनगर, पुणे येथे सापळा रचुन वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगाची झडती घेतली असता त्यांच्याकडे २ लाख १० हजार ९५० रूपये किंमतीचे ६ ग्रॅम ९३० मिली ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ, दोन मोबाईल, स्वयंचलित बॅटरी वरील वजन काटा असा मुद्देमाल जप्त करून चतुःश्रृंगी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वरील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश मानेपोलीस उप-निरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितिन धाडगे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे व चालक पो.ना. सुहास तांबेकर यांनी केली आहे.