शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील होळकरवस्ती येथे एका शेतकऱ्याच्या बोकडाचा सायंकाळच्या सुमारास बिबट्याने फडशा पाडला. त्यामुळे वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच नीलेश उमाप यांनी केली आहे. बाळासाहेब होळकर हे सायंकाळच्या सुमारास घरात बसले होते. त्यावेळी अचानक शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घरातील महिला बाहेर आल्या असता बिबट्या बोकड ओढून घेऊन चालल्याचे दिसल्याने महिलांनी आरडाओरडा केली. त्यानंतर बिबट्या तेथून धूम ठोकून शेजारील शेतात पळून गेला.
याबाबतची माहिती वनपाल गौरी हिंगणे यांना मिळताच वनरक्षक बबन दहातोंडे, रेस्क्यू टीमचे शेरखान शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच गणेश उमाप, बाळासाहेब होळकर, दत्ता कवाद, गणेश होळकर उपस्थित होते.