पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई येथे या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : संपर्क अधिकारी, सहाय्यक अभियंता (विद्युत) आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता (विद्युत).
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अमरावती/नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड 8 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई 400005.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://madc.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.