बापू मुळीक
पुरंदर : दि. 30 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत उदाची वाडी (तालुका पुरंदर) येथे यूनिसेफ नवी दिल्ली आणि मुंबई टीम यांनी भेट दिली. सदर दौऱ्याची नियोजन वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक भूवैज्ञानिक सुजाता सावळे यांनी केले होते. युनिसेफ मार्फत प्रीती दास, सांकिखी आणि सनियंत्रण विशेषज्ञ, नवी दिल्ली कौशिकी बॅनर्जी, वॉश ऑफिसर, नवी दिल्ली बालाजी व्हरकट, हवामान, पर्यावरण आणि आपत्ती धोके निवारण अधिकारी मुंबई, संदीप तेंडोलकर, राज्य सल्लागार, सुजाता सावळे सहाय्यक भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे हे अधिकारी उपस्थित होते.
सदर भेटीदरम्यान उदाची वाडी ग्रामपंचायतमधील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे बैलगाडीतून मिरवणूक काढून लेझीम व ढोल ताशांच्या गजरामध्ये तसेच रांगोळी व औक्षण करून सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी पाणी बचतीविषयी व अटल भूजल योजनेविषयी पथनाट्य सादर केले. अटल भूजल योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या भूजल माहिती प्रसारण केंद्राला भेट दिली. या इनोव्हेटिव्ह उपक्रमाबद्दल कौतुकही करण्यात आले.
युनिसेफच्या कौशिक मॅडम यांनी भेटीचा उद्देश प्रथम सांगितला. युनिसेफ ही 190 देशात काम करते. आंतरराष्ट्रीय लेव्हलला याचे रिपोर्टिंग होत असून या टीममार्फत संपूर्ण गावागावांमध्ये पाणी आहे किंवा नाही? त्याचे नियोजन कशा पद्धतीने केले जाते? क्वालिटी कशी मेंटेन केली जाते? याबाबतचे रिपोर्टिंग युनिसेफला करावयाचे असते यानंतर युनिसेफ अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर ग्रामस्थांशी चर्चा केली व प्रश्नोत्तरांद्वारे व संवाद साधून सर्व प्रकारची माहिती जाणून घेतली.
यामध्ये अटल भूजल योजना गावाला कशा पद्धतीने माहीत झाली? अटल भूजल योजनेअंतर्गत गावामध्ये कोणकोणते कामे झाली आहेत? कोणकोणते उपक्रम राबविले आहेत?पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते? जलसुरक्षा आराखडा कशा पद्धतीने केला जातो? पाण्याचा ताळेबंद कसा केला जातो?पाण्याच्या बचतीबाबत कोणकोणते उपक्रम राबविले आहेत? सदरची देखील सविस्तर माहिती घेण्यात आली.
पाण्याच्या गुणवत्तेबाबत एफटी के किटचा वापर कसा केला जातो? हे प्रात्यक्षिकद्वारे दाखविण्यात आले अटल भूजल योजनेमुळे गावामध्ये काय काय परिवर्तन झाले. याबाबत चर्चा झाली. भेटीदरम्यान त्यांनी भूजल मित्र यांच्याशी देखील संवाद साधला व भूजल मित्र हे गावाचे पिलर आहेत. म्हणून त्यांचे कौतुकही केले. डीआयपी टीमची देखील संवाद साधला व त्याच्यामध्ये डेटा व्हॅलिडेशन कशा पद्धतीने केले जाते? तसेच प्रत्येकाचे काय रोल आहेत व ते गावामध्ये कशा पद्धतीने काम करतात याची देखील सविस्तर माहिती घेण्यात आली.
सर्व ग्रामस्थांनी देखील अटल भूजल योजनेअंतर्गत झालेली कामं, झालेल्या विविध स्पर्धा, स्पर्धेत मिळालेली बक्षिसे, गावामध्ये उपक्रमांतर्गत राबविलेले उपक्रम, घेण्यात आलेली प्रशिक्षणे याबाबत सविस्तर माहिती दिली गेली. यानंतर जलजीवन मिशन योजनेचा देखील आढावा घेतला. जीवन मिशन अंतर्गत गावामध्ये झालेली कामे व सद्यस्थितीत चालू असलेले कामे यांचा माहिती घेण्यात आली. सदर दौऱ्या दरम्यान दीपक कुलकर्णी, शुभांगी काळे, अमित जाधव, ज्ञानेश्वर पांगारे, राकेश देशमुख, दर्शन साठे व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. उदाची वाडी ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळाले.