बापू मुळीक
सासवड : सोनोरी (ता. पुरंदर) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव दशरथ काळे व व्हाईस चेअरमन शिवाजी लक्ष्मण काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी सोसायटीच्या चेअरमनपदी निवृत्ती हरिभाऊ गावडे तर व्हाईस चेअरमनपदी संदीप हिरामण सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमरीन एम. बागवान यांनी जाहीर केले. सहाय्यक म्हणून मुकुंद जगताप यांनी काम पाहिले.
निवडणूक प्रसंगी भैरवनाथ विविध विकास कार्यकारी सोसायटी संचालक दत्ता कामठे, विलास काळे, रामभाऊ काळे, चंद्रकांत माकर, मंगल काळे आदी उपस्थित होते यावेळी सरपंच संतोष काळे माजी सरपंच भारत मोरे, उपसरपंच आलका शेळके, विलास काळ, रामदास काळे, संतोष काळे, नितीन काळे, राहुल काळे, समीर काळे, राजाराम काळे, मंदाकिनी काळे, श्रद्धा काळे आदी उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे हडपसर विधानसभा प्रमुख नितीन गावडे, दीपक झेंडे, बबन काळे, नारायण काळे, बाळासाहेब काळे, अर्जुन काळे आकाश कामठे, अक्षय कामठे, दत्ता कामठे, श्रीधर शिंदे. रामभाऊ काळे, नवनाथ काळे, बाळासाहेब कामठे, गणेश कामठे, संदीप काळे, संतोष काळे, मंगल काळे, अशोक काळे संतोष भांडवलकर, रमेश काळे, विश्वास काळे, दिलीप काळे, चंद्रकांत काळे, चंद्रकांत माकर उपस्थित होते. चेअरमन निवृत्ती गावडे यांच्या अर्जावर भारत मोरे सूचक व सुरेश काळे यांनी अनुमोदन दिले आहे.