नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोन युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यानुसार, कंपन्यांकडूनही आपल्या ग्राहकांसाठी विशेष फीचर्स दिले जात आहेत. त्यात जवळपास सर्वच Android फोन्समध्ये Recovery Mode हा पर्याय दिला आहे. पण तुम्हाला माहितीये का हे फीचर अत्यंत कामाचं आहे.
Android Recovery Mode फीचरद्वारे डिव्हाईसच्या अनेक समस्या सोडवल्या जाऊ शकतात. जसे की तुमचा फोन खूप स्लो चालत असेल किंवा त्याच सिस्टिममध्ये अडकला असेल. तसेच फोनमध्ये मालवेअर असल्यास हे फीचर खूप उपयुक्त ठरू शकते. याशिवाय फोनची रॅम आणि स्टोरेजही वाढवता येते आणि कॅशे फाईल्स अँड्रॉईड रिकव्हरी मोडद्वारे क्लिअर करता येतात. हे फीचर अँड्रॉईड डिव्हाईससाठी किती उपयुक्त आहे हे आतापर्यंत तुम्हाला समजले असेल. अशातच ADB च्या माध्यमातून अँड्रॉईड गॅजेट्समध्ये अपडेट्स लागू करता येतात.
जर तुम्हाला फोनमध्ये नवीन रॅम टाकायची असेल तर हे फीचर देखील वापरले जाऊ शकते. यासोबतच या तंत्रज्ञानाद्वारे तुम्ही फोनला पीसीशी कनेक्ट करून ओएस अपडेट करू शकता. तसेच या फीचरच्या माध्यमातून फोनमधून अशा काही फाईल्स काढून टाकल्या जाऊ शकतात, ज्याने फोनला धोका पोहचू शकतो.