Health Tips : सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. याच पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. पावसाळा म्हटलं की विविध आजार डोके वर काढतात. अनेकदा हे आजार अंगावर काढण्याची सवय काही जणांना असते. मात्र, तसे करू नका. वेळीच निदान झालं नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
पावसाळ्यात हे आजार वाढत असताना काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे तातडीने जा. त्याचे निदान वेळीच न झाल्यास हा आजार बळावू शकतो आणि पुढे धोकादायकही ठरू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात काय काळजी घ्यावी आणि कोणत्या वैद्यकीय चाचण्या कराव्यात याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात टायफॉइड हा आजार बळावू शकतो. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे. तीव्र ताप, वेदना, थकवा आणि डोकेदुखी अशी याची लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचार घ्यावेत.
पावसाळ्यात डेंग्यूची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. या डेंग्यू डासांच्या चावण्यामुळे होणारा हा विषाणूजन्य संसर्ग आहे. यामध्ये तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, त्वचेवर पुरळ उठणे, भूक न लागणे आणि थकवा ही डेंग्यू तापाची काही सामान्य लक्षणे आहेत. यातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे प्लेटलेट्स कमी होणे. हे डेंग्यू तापाचे पहिले लक्षण आहे. त्यामुळे पावसाळ्यात असे काही उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे.
तसेच डेंग्यूसह मलेरिया हा आजार बहुतेकदा पावसाळ्यात होतो. यात ताप येणे, अंगदुखी आणि घाम येणे अशी लक्षणे दिसतात. हा देखील एक गंभीर आजारांपैकी एक आहे. हा आजार साचलेल्या पाण्यातील विशिष्ट प्रकारच्या डासांद्वारे हा होतो. त्यामुळे याची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी.
डॉ. नामदेव जगताप ( वैद्यकीय सल्लागार विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर)