पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अहमदनगर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अहमदनगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://ahmednagar.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 72 हजारांपर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 अशी असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अहमदनगर
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
– वेतन / मानधन : दरमहा 72,000 रुपयांपर्यंत.
– वयोमर्यादा : 60 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट)
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : खोली क्रमांक ३३, ओपीडी, डीएपीसीयू, सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 29 ऑगस्ट 2024.
– मुलाखतीची पत्ता : सिव्हिल सर्जन केबिन, सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर