-संगीता कांबळे
पिंपरी : लोणावळ्यात चोरीच्या उद्देशाने 2017 मध्ये दोघांची हत्या झाली होती. याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी सलीम शब्बीर शेखची याची पुरावा नसल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली. सात वर्षानंतर दुहेरी हत्याकांडाचा निकाल मंगळवारी पुणे सत्र न्यायालयाने दिला.
आरोपी सलीम शेख आणि आसिफ शेख यांची मंगळवारी पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
3 एप्रिल 2017 रोजी भुशी धरणाच्या मागील डोंगरात सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पुढची अडीच महिने ही हत्या नेमकी कोणी केली, याचा उलगडा झाला नव्हता. मात्र, यातील एका आरोपीने हॉटेलमध्ये दारूच्या नशेत त्याच्या मित्राकडे याची वाच्यता केली. ही बाब एका खबऱ्याने पोलीस शिपायाला दिली आणि त्यानंतर या खुनाला वाचा फुटली होती. ॲड. उज्ज्वल निकाम यांनी या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.