मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपावरुन सध्या नवीन राजकारण सुरु झाले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर दिली असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपांवर देशमुखांनी पुरावे द्यावेत, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. या वादात उडी घेतलेल्या आता भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांचे कारनामे उघड करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी यांनी जर फडणवीसांबाबत पुरावे दिले, तर पुढच्या 3 तासात त्यांचा पदार्फाश करु, असं प्रतिआव्हान चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांना दिले होते. त्यावर शरद पवार गटाच्या महिला नेत्या आणि माजी आमदार विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्याकडे पेन ड्राइव्ह आहे, त्यात चित्रा वाघ यांचे कारनामे आहेत असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला आहे.
“फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येते, यामध्ये कसला आला पराक्रम अनिलबाबू. अनिल देशमुखांना माझा प्रश्न आहे, आम्ही तुमच्याकडे पुरावे मागितले आहेत, ते तुम्ही का देत नाहीत? एकदा तुम्ही पुरावे द्या, मग त्यानंतरच्या तीन तासात तुमचा पदार्फाश करणारे पुरावे आमच्याकडे सज्ज आहेत” असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. त्याला माजी आमदार विद्या चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“या पेन ड्राइव्हमध्ये चित्रा वाघचे सर्व कारनामे आहेत, चित्रा वाघ काय-काय बोलते आणि काय-काय करते, तिचे सर्व कारनामे या पेन ड्राइव्हमध्ये आहेत. तीन वाजता राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये हे उघड करणार. महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खर रुप दाखवल्याशिवाय विद्या चव्हाण राहणार नाही, हे लक्षात ठेवं” असा इशारा चित्रा वाघ यांना देण्यात आला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे काय कारनामे? शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण आज दुपारी 3 वाजता पेनड्राईव्ह बॅाम्ब pic.twitter.com/2t8ZyPYZRc
— Yogesh Kangude (@Yogesh_Kangude) July 30, 2024