Horoscope Today : आजचा दिवशी तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष ते मीन राशीपर्यंत सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊया
मेष : दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. महत्त्वाच्या गाठीभेटी घेऊ शकाल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील. सौख्य लाभेल.
वृषभ : दुपारनंतरचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. चिकाटीने कार्यरत राहाल. खर्चाचे प्रमाण कमी होणार आहे.
मिथुन : स्वास्थ्य कमी राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाच्या गाठीभेटी नकोत.
कर्क: उत्साही व आनंदी राहणार आहात. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. आर्थिक कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. बौद्धिक प्रभाव राहील.
सिंह: चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. कामे मार्गी लागतील. हितशत्रुवर मात करू शकाल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे.
कन्या : मनोबल कमी असणार आहे. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वादविवादात सहभाग नको. कामाचा ताण व दगदग राहणार आहे.
तुळः मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दुपारनंतर काहींना अडचणींचा सामना
करावा लागेल.
वृश्चिक : अस्वस्थता कमी होईल. दुपारनंतर आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असणार आहे. कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
धनु : दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनाबेल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. दुपारनंतर काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. अतिरिक्त कामे करावी लागतील.
मकर : दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी पडतील. आनंदी व आशावादी राहाल. प्रसन्नता लाभेल. चिकाटी वाढेल. प्रियजन भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विविध लाभ होतील.
कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत स्वास्थ्यकर असणार आहे. प्रवास सुखकर होतील.
मीन : चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. काहींना गुप्त वार्ता समजतील.