ठाणे : पंधरा हजार रुपयांच्या कॅश बाँडवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपट पाहण्यास आलेल्या एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
या प्रकरणावर सुनावणी दरम्यान त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, त्यानंतर जामीनासाठी अर्ज केला होता.
हर हर महादेव चित्रपट सुरु असतानाच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रवेश केल्याने चित्रपटगृहात गोंधळ निर्माण झाला. जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते व उपस्थित प्रेक्षकांमध्ये वादावादी झाली.
यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, हेच प्रकरण आव्हाडांना भोवल्याचं दिसून येतंय.
या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
निर्णयानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जामीनासाठी अर्ज केला त्याला जामीनाला तपास अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १५ हजारांच्या कॅश बॉंडवर जामीन मंजूर केला.