नवी मुंबई : गेले दोन ददिवस झाले राज्यात पावसाचा जोर दिसून आला अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालेले दिसून आले. अशातच आता एक हादरवणारी घटना घाली आहे. नवी मुंबईत एक 3 मजल्यांची बिल्डिंग कोसळली आहे. पहाटे सर्वजण साखर झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली.
सुरुवातीला अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर ढिगाऱ्याखाली दोघे अडकले असून इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखाळी अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून एकाचा शोध सुरू आहे.
नवी मुंबईत एक तीन मजल्यांची इमारत कोसळल्यानं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील शहाबाज गावातील 3 मजल्यांची बिल्डिंग पत्त्याच्या बांगल्यासारखी कोसळली आहे. बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस 3 मजली इमारत पहाटे कोसळली. यामध्ये तीन नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत होती. नंतर दोघांनाही बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डिंगला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले. मात्र, तीन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती. दुर्घटनेची बातमी मिळताच, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिकेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
नेमकं घडलं काय?
बेलापूर सेक्टर 19 शहाबाज गावातील इंदिरा निवास मधील तीन मजली इमारत कोसळली आहे. ही इमारत 2013 मध्ये बांधण्यात आली होती. कोसळलेल्या इमारतीमध्ये 3 गाळे आणि 17 फ्लॅट्स होते. पहाटे अचानक इमारतीला हादरा बसल्यानंतर नागरिक घाबरून घराबाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आतापर्यंत इमारतीत राहणारी 40 लोक आणि 13 मुलं सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. तर, ढिगाऱ्याखालून दोघांना बाहेर काढण्यात आलं आहे. दोघेही सुखरूप असल्याची माहिती समोर आली असून एका बेपत्ता व्यक्तीला असून तिचा शोध सुरू आहे.