संतोष पवार
पुणे : राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेत्तरांचे वेतन शालार्थ वेतन प्रणालीतुन अदा करण्यात येते. दरमहा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होणाऱ्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम शालार्थ मधुन मिळत नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी-समस्या लक्षात घेता फंडाच्या रकमेची अद्यायावत माहिती तसेच अग्रीम/ना परतावा रक्कम, फंडाच्या पावत्या, लेखा आदि बाबी ऑनलाईन करून शालार्थ प्रणालीतून त्याचा हिशोब मिळणेबाबत शासनाने आदेश काढलेले आहेत.
त्याच अनुषंगाने भविष्य निर्वाह निधीची मार्च २०२०/२१ अखेरची शिल्लक रक्कम, अग्रीम/ना परतावा रक्कम ऑनलाईन पद्धतीने शालार्थ प्रणालीमध्ये भरण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या वतीने पुणे जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील एन.ई.एस हायस्कूल येथे शुकवार दि २६ जुलै रोजी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधिक्षक (पुणे ग्रामीण) दत्ता कठाळे, पुणे शहर अधिक्षक संजय गंभीरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरच्या शिबीरात इंदापूर तालुक्यातील एकूण सुमारे ५५ ते ६० माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील भविष्य निर्वाह निधीधारक कर्मचाऱ्यांच्या मार्च २०२१ रोजी शिल्लक असणाऱ्या रकमेची नोंद, अग्रीम/ना परतावा रक्कम आदि बाबींची ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये नोंद करण्यात आली.
यावेळी एन. ई. एस हायस्कूल निमसाखरचे वरिष्ठ लिपिक बरकत डांगे ,इंदापूर तालुका शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष तथा बाबीर विद्यालय रुईचे वरिष्ठ लिपिक दत्तात्रय काळे, कार्याध्यक्ष सुधाकर दंडवते, जगन्नाथ कुबेर, सुभाष देवकर, नितीन मोरे, नंदकुमार पाटील आदिंसह तालुक्यातील लिपिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते…