Lifestyle : तुम्ही देखील नियमितपणे त्वचेची काळजी घेताय? तर तुमच्यासाठी लिंबू ठरू शकतो फायद्याचा. नैसर्गिक ब्लिचसाठी लिंबू फायदेशीर मानला जातो. लिंबू हा त्वचेसाठी उपयुक्त मानला जातो. लिंबू चेहऱ्यासाठी नैसर्गिक ब्लिच असते. तुम्ही लिंबाच्या सालीचा वापर डेड स्किन आणि ब्लॅकहेड्स काढण्यासाठी करू शकता.
चेहऱ्यावर ब्लॅकहेड अर्थात काळे डाग असतील तर ते फारच वाईट दिसते. लिंबाचा रस चेहऱ्यावर एखाद्या स्क्रबप्रमाणे काम करतो. ज्यामुळे नैसर्गिकरित्या बॅकहेड्स दूर होतात. लिंबूचा स्क्रबर तुम्ही घरगुती पद्धतीने बनवू शकता. त्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसात साखर मिसळून स्क्रब करू शकता किंवा लिंबाच्या सालीवर साखर टाकून नाकावर घासू शकता. या स्क्रबने चेहरा स्वच्छ होतो.
लिंबाचा रस आणि गुलाब पाणी काही थेंब गुलाब जल घ्या आणि त्यामध्ये लिंबू रस मिसळा. या मिश्रणाला कापसाच्या मदतीने ब्लॅकहेड असलेल्या ठिकाणी तीन-चार मिनिटे लावून ठेवा. या मिश्रणाला दिवसातून दोनवेळा लावा. यामुळे व्हाईटहेडदेखील दूर होतील. चेहऱ्याला कोमट पाण्याने धुवा.