पुणे : पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रभर पाऊस सुरूच राहिल्याने धरण साठ्यातील पाणी पातळी वाढली आहे. मुळशी धरण परिसरात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुळशी धरण जलाशय सकाळी ७ वाजता ७० टक्के क्षमतेने भरले असून आज दू. २ वा धरणाच्या सांडव्यावरून २५०० क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. नदी पात्रात,पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी -जास्त करण्यात येईल.
मुळशी धरण जलाशय पटली वाढली असून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. तसेच सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे आवाहन बसवराज मुन्नोळी( हेड-डॅम्स, इस्टेट ॲंड ॲडव्होकसी टाटा पॉवर, मुळशी) यांनी केले आहे.