उरण : तालुक्यातील पिरकोन-सारडे रस्त्यावर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात उरण पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता, मृतदेह पनवेल तालुक्यातील केळवणे गावातील राजेश ठाकूर (४०) या स्थानिक तरुणाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश ठाकूर हा तरुण पत्नी व तीन लहान मुलींसोबत केळवणे गावात राहत असे. तसेच जेएनपीए बंदर परिसरात तो कॅन्टीन चालवत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास राजेश मोटारसायकलवरून केळवणेला जायला निघाला होता. ९ च्या सुमारास त्याच्या पत्नीने फोन करून त्याची चौकशी केली असता कोप्रोली नाक्यावर सामान घेत असल्याचे त्याने सांगितले.
परंतु बराच वेळ होऊनही पती घरी न आल्याने तिने नातेवाईकांसह शोधाशोध केली असता राजेशची मोटारसायकल सारडे रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आली. तर राजेशचा मृतदेह रस्त्याकडेला पडलेला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जागेचा पंचनामा करून राजेशला इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.