राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. तुझ्या लहान बहिणीशी मला लग्र करायचे आहे असं म्हणत विवाहीतेच्या तोंडात फिनेल बाटली ओतल्याची घटना घडली आहे. लग्रामध्ये हुंडा दिला नाही म्हणून दुसरं लग्र करण्यासाठी सोडचिठ्ठी दे असं म्हणत विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती आणि सासूवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेश्मा सुनिल साळवे चिंचविहीर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पती सुनिल कारभारी साळवे आणि सासू मंदा साळवे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी रेश्मा साळवे यांचे पती सुनिल साळवे हे बाहेर नोकरीला आहेत. २४ जून २०१८ रोजी विवाह झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी रेश्मा साळवे यांना सुखात ठेवले, त्यानंतर सुनिल सुट्टीला घरी आल्यानंतर विवाहीता रेश्मा यांच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद घालत मारहाण करू लागला. तसेच सासू मंदा या देखील विवाहितेला मारहाण करत असे. ७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी दारू पिऊन आलेल्या सुनिल याने विनाकारण मारहाण करायला सुरुवात केली.
तुला मुलगा होत नाही. तुझ्या आईने लग्नात हुंडा दिला नाही. तुझ्या आईकडून दोन लाखाचा हुंडा घेऊन ये. तुझ्यामुळे मला दूसरे लग्र करता येत नाही. मला सोडचिठ्ठी दे असे सांगितल्यानंतर विवाहीता रेश्मा यांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करत तुझ्या लहान बहिणीशी माझे लग्र लावून दे असे वारंवार म्हणत घरातील फिनेलची बाटली तोंडात ओतली. असं फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास राहरी पोलिस करत आहेत.