पुणे : पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी पत्नी आईवडिलांसोबत पोलीस ठाण्यात जात असताना वाटेत पतीने पत्नीच्या गळ्यावर सपासप वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील दत्तवाडी परिसरात घडली आहे.
ही घटना गुरुवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता शिवदर्शनमधील गजानन महाराज मंदिराच्या मागील गेटसमोर घडली आहे. याप्रकरणी पतीला दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अक्षय मोहन सोनार (वय २७, रा. गोलघर, शिवदर्शन) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी कार्तिका अक्षय सोनार (वय २०) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार. अक्षय आणि कार्तिका यांच्यात भांडणे झाली होती. तेव्हा कार्तिका आपल्या आई वडिलांसोबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासठी जात होती. यावेळी अक्षय हा पाठीमागून अचानक आला आणि त्याने फिर्यादी यांना काही न कळताच एका हाताने पकडून दुसर्या हाताने ‘‘आता तुला मारुनच टाकतो’’असे बोलून चाकून त्यांच्या गळ्यावर सपासप वार केले.
दरम्यान, कार्तिका गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी पतीला अटक असून या घटनेचा पोलीस तपास उपनिरीक्षक निकाळजे करीत आहेत.