पुणे : मूर्ती लहान पण किर्ती महान या म्हणीला साजेसा विक्रम पुण्यातील एका चिमुकल्याने रचला आहे. १५ छंद असलेले शिवतांडव स्तोत्र आणि २१ छंद असलेले महिषासुर मर्दिनी स्तोत्र, ही दोन्ही स्तोत्रे संस्कार एकत्रपणे फक्त ५ मिनिट ५१ सेकंदांमध्ये गातो.
आजपर्यंत हे आव्हान इतर कोणीही पेलू शकलेले नाही, वयाच्या आठव्या वर्षी या मुलाने विश्वकरंडक रचला आहे. त्याच्या या अनोख्या रेकॉर्डचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्कार ऋषीकेश खटावकर असे या विश्वविक्रम करणाऱ्या चिमुकल्याचे नाव आहे. संस्कार इयत्ता तिसरीत शिकत आहे. लहान वयात संस्कारने जागतिक विक्रम नोंदवला आहे. संस्कार पुण्याच्या मॉडर्न स्कूलमध्ये शिकतो.
मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक…
संस्कारचे वडिल ऋषीकेश खटावकर आयटी क्षेत्रात काम करतात. ऋषीकेश खटावकर यांनी तब्बल सहा महिने या स्तोत्रांची त्याच्याकडून तयारी करुन घेतली होती. संस्कारच्या या अनोख्या विक्रमाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे.