लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर – नायगाव रस्तावरील ओढ्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सिमेंटच्या नळ्या टाकण्यात आल्या आहेत. मुसळधार झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या बाजूला राहणाऱ्या थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते.
यावेळी सदर राहणाऱ्या नागरिकांनी माजी उपसरपंच भरत कुंजीर व राष्ट्रवादी विद्यार्थी सरचिटणीस ऋतिक कुंजीर यांना याबाबत माहिती दिली होती व ओढ्यावर सिमेंटच्या नळ्या टाकण्यासाठी आमदारांकडे पाठपुरावा करावा अशी विनंती येथील नागरिकांनी केली होती. त्यानुसार भरत कुंजीर व ऋतिक कुंजीर यांनी सदर गोष्टीची माहिती घेऊन व पाहणी करून शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली होती.
त्यानुसार आमदार अशोक पवार यांनी सदर घटनेची माहिती घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रोहित लकडे यांना दिल्या होत्या.
यावेळी अभियंता लकडे यांनी स्थळपाहणी करून तत्काळ सदर ठिकाणी सिमेंटच्या नळ्या टाकल्या. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती नष्ट झाली असून कायम स्वरूपी आता पाण्याचा बंदोबस्त झाला असल्याने सदर ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी आमदार अशोक पवार, माजी उपसरपंच भरत कुंजीर, ऋतिक कुंजीर व डी वाय पाटील यांचे आभार मानले आहेत.