सागर जगदाळे
भिगवण : तक्रारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही इंदापूर तालुक्यातील नावाजलेली केंद्रशाळा आहे. या शाळेत मोठ्या प्रमाणात वेठबिगारी व कष्टकऱ्यांची मुले शिक्षण घेतात. आधुनिकीकारणाच्या जगात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला जात असताना या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले आहे.
नुकताच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत तक्रारवाडी शाळेचे एक दोन नव्हे तर 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पास झाले असून त्यांच्या या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे. या मुलांना घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांनी नक्कीच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावरती नेण्याचे कार्य करत आहेत. तितकीच मेहनतही या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे.
इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शाळेकडे पालकांचा कल हा वाढत चाललेला आहे. कारण प्राथमिक शाळेतील असणारे गुणवंत शिक्षक व विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांची असणारी तळमळ पाहून नक्कीच प्राथमिक शाळांना पूर्वीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही.
जिल्ह्यातील गुणवत्ता यादीत या शाळेतील किमान सहा विद्यार्थी चमकू शकतात अशा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक राजेश नाचण यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मिळालेले यश ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असून भविष्यात देखील शाळेचा आलेख चढता राहणार असल्याचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज वांझखडे यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक विनोद घोगरे व मनिषा चौधरी यांचा सत्कार करताना अभिनंदन केले.
पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये नेत्रदीपक यश मिळविणारे विध्यार्थी
सर्वेश सुनिल थोरात- 270, समर्थ शिवरुद्र उनवणे-260, कु.धनश्री राहुल लंबाते -256, ओंकार नारायण खंडागळे -250, समर्थ दत्तात्रय नरुटे-230, कु.अनुष्का शांताराम जाधव-218, साद शब्बीर शेख-210, कु.संस्कृती तानाजी धुमाळ-204, ज्ञानेश उमेश वाळके-202, शिवराज हरिश्चंद्र वाघ-202, अथर्व अनिल मोटे-190, कु.अनुष्का संतोष नरुटे-190, सोहम प्रमोद देवकर-186, ओंकार दिपक गायकवाड -162, कु.जैनब फिरोज मुलाणी-156, कु.आदिती दिनेश वाळके-146, कु.वैभवी भारत लोखंडे-128