नवी दिल्ली : सध्या सोशल मीडिया अॅप्सचा वापर वाढला आहे. त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) यांसह WhatsApp च्या युजर्समध्येही वाढ होत आहे. त्यात WhatsApp चा वापर इतर अॅप्सच्या तुलनेत अधिक होत आहे. त्यानुसारच कंपनीकडून नवनवीन फिचर्स आणले जात आहेत. असे असतानाच आता WhatsApp वर भन्नाट फिचर येणार आहे. त्यातून आपल्या फेव्हरिट लोकांशी चॅट करणे सोपं होणार आहे.
WhatsApp दररोज त्याचा युजर्स अनुभव सुधारण्याचा प्रयत्न करते. WhatsApp च्या आवडत्या टॅबवर काम करत आहे. यामध्ये तुम्हाला अशा लोकांच्या चॅट्स मिळतील, ज्यांच्याशी तुम्ही जास्त बोलता. युजर्सना फास्ट चॅट ऍक्सेस करता यावे यासाठी हे फीचर आणले जात आहे. व्हॉट्सॲपने हे फिचर आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या हे टेस्टिंग बेसवर कार्यरत असून, काही मोजक्याच युजर्सना हे मिळणार आहे.
WhatsApp ने आपल्या ब्लॉगमध्ये नवीन फीचरची माहिती दिली आहे. तुम्ही आवडीच्या टॅबमध्ये संपर्क देखील जोडू शकता आणि त्याची लिस्ट कधीही संपादित करू शकता. या फिचरच्या माध्यमातून फेव्हरिट लोकांशी चॅट करणं सोपं होणार आहे.