मुंबई : मुंबईकरांना येणाऱ्या काळात एका नव्या मार्गाने प्रवास करण्याची सुविधा मेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास म्हटलं की अनेकांनाच ही बाब म्हणजे तारेवरची कसरत वाटते. परंतु याचा त्रास कमी होणार आहे. आता मुंबईतील पहिली भुमिगत मेट्रो आता लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या मेट्रोचं लोकर्पण 24 जुलै रोजी होणार असल्याचे भाजप नेते विनोद तावडे यांनी याबाबत ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
प्रधानमंत्री @NarendraModi जी ने मुंबई वासियों के जीवन को सुगम बनाने की गारंटी दी थी, जो पूरी होने जा रही है।
मुंबई की पहली भूमिगत मेट्रो (Aqua Line) 24 जुलाई से शुरू हो रही है , जो शहर की रफ्तार को नई उड़ान देगी। pic.twitter.com/0YgepYbiHw
— Vinod Tawde (@TawdeVinod) July 17, 2024
मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा आणि प्रवासाचा अविस्मरणीय अनुभवही देईल. या मेट्रोच्या मार्गामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुसाट होणार आहे. विनोद तावडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे भूमिगत मेट्रोचे एकंदर रुप कसं असेल, हा प्रवास कसा असेल याची कल्पना येत आहे.
मुंबईतील या पहिल्या भूमिगत मेट्रोमध्ये 33.5 किमी इतके अंतर वाऱ्याच्या वेगान ओलांडणे सहज शक्य होणार आहे. आरे कॉलनी इथून हा प्रवास सुरू होणार असून त्यातील अंतिम स्थान बीकेसी अर्थात वांद्रे कुर्ला संकुल असणार आहे. तब्बल 27 स्थानकांच्या या भूमिगत मेट्रोमध्ये 26 स्थानके ही जमिनीखाली अर्थात शहराच्या शब्दश: उदरातून जाणार आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ही मेट्रो सेवा सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार असून, रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या मेट्रोचा वेग जवळपास ताशी 90 किमी इतका असेल. एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वेगाने 35 किमीचे हे अंतर भूमिगत मेट्रोनं अवघ्या 50 मिनिटांमध्ये ओलांडता येणार आहे, म्हणजेच तासाभराहून कमी वेळ लागणार आहे.
मुंबईतील भुयारी मेट्रो प्रकल्पांतर्गत 56 किमी लांबीच्या 27 ठिकाणांचा समावेश करण्यात येणार आहे. यातील 26 स्थानके भुयारी असतील. कफ परेड, विधानभवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, सीतालादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, डोमेस्टिक एअरपोर्ट, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे डेपो अशी भुयारी मेट्रोचे स्थानक असतील.