पुणे : महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु झाली आहे. ही योजना आगामी विधान परिषदेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सुरु केली आहे. यावर आता शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही चांगली योजना आहे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजना आल्या. बहीण भावाचा विचार होतोय ही चांगली गोष्ट, याचा आनंद होतो आहे. लोकसभेत मतदारांनी जे मतदान केलेय त्याचा हा चमत्कार आहे, म्हणून मतदारांनी मते व्यवस्थित दिली तर बहीण आणि भाऊ सर्वांना आठवतील असे मिश्किल टीपण्णी शरद पवार यांनी केली.
शरद पवार पुढे बोलले की लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना बजेटमध्ये आल्या आहेत. मागे अनेक वेळा बजेट मांडले गेले होते. त्यावेळी त्यांना लाडकी बहीण आणि भाऊ दिसले नाही.चांगली गोष्ट आहे. बहीण भावांचा विचार होतोय याचा आनंद आहे. लोकसभेत मतदारांनी जे मतदान केलंय त्याचा हा चमत्कार आहे. म्हणून मतदारांनी मते व्यवस्थित दिली तर बहीण भाऊ सर्वांची आठवण होतेय असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे. परंतू एक काळजीची देखील गोष्ट आहे, आपल्या राज्याचा क्रमांक आता सातवर गेला आहे. राज्याची स्थिती काय आहे. एककाळ असा होता राज्य पहिल्या दोन तीन क्रमांकावर असायचे, नियोजन आयोगाने यादी जाहीर केली. त्यात आपण ११ व्या नंबरवर आहोत. ही चिंतेची गोष्ट असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.
राज्य मजबूत राज्य होतं, आता ते राहिलं नाही…
शरद पवार म्हणाले कि महाराष्ट्रावर 8 लक्ष 80 हजार कोटीचं कर्ज आहे. यावर्षीचं कर्ज वेगळं आहे. 20 हजार कोटीची महसूली तूट आहे. बजेट जनरली फेब्रुवारीत मांडतो. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पुरवणी मागण्या मांडतो. यावेळी बजेट मांडलं गेले. पुरवणी मागण्या मांडल्या. त्याची रक्कम 94 हजार 800 आहे. त्यात 40 कोटी बहिणींसाठी आहे. प्रचंड रकमा मांडल्या आहेत. याचा अर्थ एकच आहे लोकसभेचा निर्णय लक्षात घेऊन हे पाऊलं टाकलं गेलं आहे. आर्थिकदृष्ट्या आपलं राज्य मजबूत राज्य होतं. आता ते राहिलं नाही. दरडोई उत्पन्न घटलं आहे. राज्यप्रमुख मग कोणीही असो हे राज्याच्या भविष्यासाठी चांगले नसल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.