पंढरपुर : राज्यात सद्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेची चर्चा सुरु आहे. सत्ताधारी त्या योजनेचं कौतुक करीत आहेत तर विरोधक मात्र टीका. तसेच काहींचा असा हि सूर आहे, कि बहिणी लाडक्या मग भाऊ का नाहीत? तर आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्र्यांनी खास योजनेची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण..
21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला गर्दी करत आहे. या योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्र्यांनी खास योजनेची घोषणा केली आहे.
‘या’ तरुणांना मिळणार सहा हजार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली आहे. या महापूजेनंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण या योजनेनंतर लाडक्या भावांसाठीही एका खास योजनेची घोषणा केली आहे. जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील.
सरकार भरणार पैसे
हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल. त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर (कुशल कामगार) तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.