सांगली : साखरेची एमएसपी (किमान विक्री किंमत) लवकरच 4 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली असून, केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच दिली आहे. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या काही वर्षापासून ऊसाची केवळ एफआरपीच वाढत आहे. असे असताना त्या तुलनेत साखरेचे दर मात्र वाढताना दिसत नाहीत. यामुळे साखर कारखान्यांना मिळणारी तफावतीची रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने कारखानदारी अडचणीत सापडत आहे. यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेल तर साखरेचे किमान मूल्य प्रति क्विंटल 4 हजार 200 रुपये करण्यात यावे अशी मागणी 524सहकारी साखर कारखान्यांनी केली आहे. तसा प्रस्ताव देखील केंद्रीय मंत्री मंडळासमोर आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल असे देखील सहकारी साखर कारखाना संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
ऊसाचा एफआरपी वाढत असताना त्या तुलनेत साखरेचे दर वाढत नसल्याचे चित्र आहे. यामुळे साखर कारखान्यांना मिळणारी तफावतीची रक्कम तुटपुंजी असल्याने कारखानदारी अडचणीत येत आहे. सहकारी साखर कारखानदारीवर अनेक घटक अवलंबून असून हा रोजगारक्षम व्यवसाय आहे. यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेल तर साखरेचे किमान मूल्य प्रति क्विंटल ४२०० रुपये करण्यात यावे, अशी मागणी 524 सहकारी साख कारखान्याच्या राष्ट्रीय संघाने केली आहे. हा प्रस्ताव आता केंद्रिय मंत्रीमंडळासमोर असून लवकरच याला मंजुरी मिळणार, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.
इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी…
पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी विजयाचा दिवा लावला, अशी थेट तुलना भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी करून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे माझ्यासोबत होते. परंतु काही अज्ञात शक्ती देखील माझ्यासोबत होत्या. त्यांची नावे घेतली तर अवघड होईल. परंतु ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ असे सांगत धैर्यशील माने यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक अदृश्य शक्तींचे सहकार्य झाल्याचे स्पष्टोक्ती दिली. परंतु भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मात्र इचलकरंजीला पाक व्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने नव्या वादाला तोंड फोडल्याचे बोलले जात आहे.