नाशिक : अंजनेरी येथे रविवारी दुपारी आठ ते दहा मुले सकाळी ट्रेकिंग करता गेली. त्या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला असल्याने ही मुले त्या ठिकाणी अडकली. याबाबत मुलांनी पालकांना माहिती दिली. पालकांनी आपत्ती व्यवस्थापनाला याविषयी माहिती दिली. मात्र, प्रथमतः अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क होऊ शकला नाही.
यानंतर वन विभागाशी संपर्क करून या ठिकाणावरील माहिती घेण्यात आली. काही पर्यटक सकाळी पर्यटनासाठी गेले होते; परंतु त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याने त्यांना खाली येण्याच्या पायऱ्यांवर पावसाच्या पाण्यामुळे येणे शक्य होत नसल्याने तेथे थांबलेले होते. काही कालावधीनंतर वनविभागाद्वारे पर्यटकांना सुखरूपपणे खाली आणण्यात आले.