Technology : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेकजण ई-मेलचा वापर करतात. ई-मेल पाठवण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी एक ठराविक आयडीची गरज असते. त्या आयडीनुसारच ई-मेल पाठवला जातो. यामध्ये Google चे सर्वाधिक Account असल्याचे म्हटले जात आहे. पण तुम्ही वापरत असलेलं Google Account सुरक्षित आहे की नाही हे आता तपासता येणार आहे.
तुमच्या परवानगीशिवाय तुमचे ई-मेल इतर कोणालाही पाठवले जात नाहीत हे तपासा. यासाठी Gmail च्या सेटिंगमध्ये जाऊन फॉरवर्डिंगवर क्लिक करा. POP/IMAP वर क्लिक करा आणि नंतर फॉरवर्डिंग सेटिंग्जसाठी रिव्ह्यूवर जा. काहीही संशयास्पद वाटत असल्यास, ई-मेल ताबडतोब काढून टाका आणि तुमच्या Google खात्याचा पासवर्ड बदला.
तसेच तुमच्या Google अकाउंटच्या पासवर्डची सुरक्षा तपासा. या वैशिष्ट्याच्या मदतीने, तुम्ही Google वर सेव्ह केलेले सर्व पासवर्ड तपासू शकता की ते कोणत्याही प्रकारे गैरवापर केला की नाही. यासाठी तुम्हाला https://passwords.google.com वर जावे लागेल. यानंतर गो टू पासवर्ड मॅनेजरवर क्लिक करा. येथे तुम्हाला दोन पर्याय मिळतील, पासवर्ड वीक आहे आणि दुसरा पासवर्ड स्ट्राँग करणे.
याशिवाय, Google Account अनेक ॲप्स आणि वेबसाईट्शी जोडलेले असते. अशा परिस्थितीत ॲप आणि वेबसाईट तपासण्यासाठी https://myaccount.google.com/ वर जा. यानंतर सुरक्षेत जाऊन तपासणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला थर्ड पार्टी ॲप आणि अकाउंट एक्सेसवर क्लिक करावे लागेल. कोणत्याही ॲपसाठी Google खाते आवश्यक नसल्यास ते काढून टाका.