पुणे : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एकेक कारनामे उघड होत असताना, अजून एक माहिती समोर आली आहे. पूजा खेडकरने लाल दिवा लावलेली ऑडी कार वापरली, त्या कारने तब्बल 21 वेळा वाहतूक निय मोडल्याची माहिती समोर आली आहे. वाहतूक नियम मोडल्यामुळे पोलिसांनी त्या कार मालकाला 27 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावला होता. अखेर खेडकर कुटुंबियांनी 27 हजार 400 रुपयांचा दंड भरलाय. अंबर दिवा लावलेली ती ऑडी गाडी खेडकर कुटुंबिय डायरेक्टर असलेल्या कंपनीच्या नावे आहे. IAS पुजा खेडकर तीच ऑडी कार वापरत होत्या.
गाडी कोणाच्या मालकीची?
आयएएस अधिकारी पूजा खेडकर वापरत असणारी ती ऑडी कार थर्मोव्हेरिटा इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. या गाडीचे मूळ मालक नोरमा खेडकर यांच्यासोबत एका कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करत होते. मनोरमा खेडकर या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. डिलिजन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव आहे. ही कंपनी मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे.
जमीन हडपण्यासाठी पिस्तुल काढलं..
पूजा खेडकर यांच्या नावे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील धडवली गावात स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करण्यात आली. मात्र जेवढी जमीन खरेदी करण्यात आली त्यापेक्षा जास्त जमिनीवर खेडकर कुटुंबाने दावा करायला सुरुवात केली. मात्र शेतकऱ्यांनी याला विरोध केला असता, पुजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल काढून या शेतकऱ्यांना धमकावलं होत. आता ही जमीन खेडकर कुटुंबीयांच्या सामाईक मालकीची असून अजून या जमीनीच्या वाटण्या झालेल्या नाहीत, असा पासलकर कुटुंबीयांचा दावा आहे.