नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ व्याजदर ८.२५ टक्क्यांपर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२३-२४ साठी गत वर्षाच्या ८.१५ टक्के दरावरून नव्या व्याजदरात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीत ईपीएफ व्याजदरात ०.१० टक्का वाढ करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार, ईपीएफओने एक्स या समाज माध्यमावर गुरुवारी रात्री व्याजदारात वाढीची घोषणा केली.