पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. प्रशिक्षण सहयोगी आणि प्रशिक्षण सहाय्यक हे पद आता भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अकोला येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pdkv.ac.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
– पदाचे नाव : प्रशिक्षण सहयोगी आणि प्रशिक्षण सहाय्यक.
– नोकरीचे ठिकाण : अकोला.
– शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. कृषी कीटकशास्त्रात किंवा एम. एससी. कृषी कीटकशास्त्र, बी. Sc. शेती मध्ये
– वेतन / मानधन : दरमहा रु. 15,000/- ते रु.50,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 19 जुलै 2024.
– मुलाखतीची पत्ता : प्रभारी अधिकारी कार्यालय, कृषी संशोधन केंद्र.