नाशिक : नाशिकमध्ये रस्त्यावर नागरिकांनी नीट पायी चालावं कि नाही. असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामागील कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरांमध्ये हिट अँड रनच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे समोर आले आहे. शहरात गेल्या दहा दिवसात हिट अँड रन मुळे तब्बल चार पादुचरांचा मृत्यू झाला आहे. तसेच आठ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. गेल्या पाच महिन्यांचा आकडा बघितला तर पाच महिन्यात 85 जणांना बेदरकार वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे जीवास मुकावे लागले.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी ताबोडतोब कारवाई करणं गरजेचं आहे. अशी भावना बळी गेलेल्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. या आठवड्यातच नाशिक शहरात झालेल्या हिट अँड रनच्या घटनांमध्ये जवळपास चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत.
नाशिकच्या अशोका मार्ग येथे 86 वर्षीय मधुकर नेगे यांना वेगाने दुचाकी चालवत आलेल्या चालकांने धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ७ जुलै रोजी नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या येवलेकर मळ्यात बॉईज टाऊन रस्त्यावर संध्याकाळी भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या 49 वर्षीय निधी वारे यांना पाठीमागून सुसाट आलेल्या टेम्पोने धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला तर विठ्ठल भाबड या 65 वर्षीय वृद्धाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने त्यात ते गंभीरता जखमी झाले आहेत
तसेच ७ जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील विसे मळ्याजवळ सुसाटकार चालकांने पाठीमागील बाजूने दुचाकीस्वारांना धडक दिली आहे. या धडकेमध्ये 31 वर्षीय चेतन चव्हाण आणि 27 वर्षीय मयूर नंदन हे दोघे मित्र गंभीर रित्या जखमी झाले. 9 जुलै रोजी नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील बारदान फाटा येथे मद्य धुंदकारचालकान रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेला पाठीमागील बाजून जोरदार धडक दिली होती. यामध्ये अर्चना शिंदे या 31 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. 10 जुलै रोजी नाशिक रोड परिसरात सिटी लिंक बसच्या धडकेत सानवी गवई या पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.
पोलिसांनी आता हिट अँड रनच्या प्रकरणी शहरात नाकाबंदी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लवकरच या संदर्भात कठोर पावले उचलली जातील असा पोलिसांनी सांगितले आहे. शहरात घडणाऱ्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण असताना दुसरीकडे मुजोर वाहनचालकांची दादागिरी वाढत आहे. पोलिसांनी वेळीच या प्रकरणी कारवाई न केल्यास नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होईल, अशी परिस्थिती सध्या नाशिकमध्ये निर्माण झाली आहे.