मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. खालापूर टोल नाक्याजवळ पुणे लेनवर ही घटना घडली असून सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. महामार्ग पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग टिम, देवदूत यंत्रणा आणि खालापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत पथकाला आग अटोक्यात आणण्यात यश आले आहे, परंतु आगीत कार जळून खाक झाली.