लोणी काळभोर : भारताने संशोधन आणि तंत्रज्ञान निर्मिती या क्षेत्रात जागतिक ओळख मिळवली आहे, त्यात चमक वाढवण्याची जबाबदारी पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांवर आहे. या आव्हानात्मक काळात देशाला तुमची पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे. कोणतीही पदवी, मान्यता, प्रमाणपत्र किंवा पुरस्कार सहजासहजी मिळत नाही, तर सातत्यपूर्ण प्रयत्न आणि वचनबद्धतेने ती मिळवता येते.
विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यातील यश वैयक्तिक आणि व्यावसायिक यासारख्या अनेक गुणांवर अवलंबून असते. विद्यार्थ्य्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून देशाला नवीन मार्ग दाखवावा आणि देशाला जगात महासत्ता बनवावे, असे मत इस्त्रोच प्रमुख डॉ. सोमनाथ एस यांनी व्यक्त केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणेच्या पाचव्या पदवीदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी भारतीय केमिकल सोसायटीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, सामा टेक्नॉलॉजीज यूएसएचे सीईओ आणि संस्थापक श्री सुरेश कट्टा, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा.ज्योती ढाकणे, डॉ.पी.बी. जोशी, डॉ. सुनीता कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. महेश चोपडे, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. ज्ञानदेव निलवर्ण यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
दरम्यान, विद्यापीठाने सामा टेक्नॉलॉजीज यूएसएचे सीईओ आणि संस्थापक श्री सुरेश कट्टा यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. तसेच पहिला भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार डॉ. गणपती यादव यांना प्रदान करण्यात आला.
मला विश्वास आहे की तुमची प्रतिभा, कल्पना, उर्जा आणि उत्साहाने तुम्ही यशस्वी आणि परिपूर्ण करिअर बनवाल आणि देशाच्या अपेक्षा पूर्ण कराल. भविष्यातील भारत घडवण्यासाठी तुमचा सहभाग आवश्यक आहे.
पदवी प्रदान हा विद्यार्थ्यांना आपल्या गुरूजनांकडून सल्ला घेण्याचा दिवस असतो. विज्ञानासोबत आध्यात्माचे शिक्षण घ्यावे. आपल्या क्षमतेपेक्षा अधिक निर्माण कराण्याची ताकद आपल्यात असावी असे डॉ. सोमनाथ एस म्हणाले.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. गणपती यादव म्हणाले, सध्याला कार्बनडायऑक्सडच्या मोठ्या प्रमाणात उत्सर्जनामुळे जगाला धोका निर्माण झाला आहे. कार्बन उत्सर्जन कमी अथवा शुन्य उत्सर्जन करणारे तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे आहे. ग्रीन उर्जानिमित्त आणि उपयोगाबाबत नारिकांना सुशिक्षित करावे लागणार आहे.
हायड्रोजन हे जगाला वाचविण्याचे साधन आहे. २०५० पर्यंत क्रुड आईल नसणार आहे. त्यामुळे पर्य़ायी इंधानाच्या वापराकडे आपल्या जावे लागले.मानवता कल्याणासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. एमआयटी एडीटी विद्यापीठात मिळणाऱ्या सर्वांगिण विकासात्मक शिक्षणाचा आपले भविष्य घडविण्यासाठी करावे.
पदवीधरांना केवळ परंपरेचे पालन न करता सर्जनशीलतेने विचार करण्याचा आणि नवीन शोध घेण्याचा सल्ला दिला. असा सल्ला प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पाहुण्यांनी पदक विजेत्यांचे आणि इतर उत्तीर्णांचे अभिनंदन केले. प्रा. स्नेहा वाघटकर, डॉ. अशोक घुगे, प्रा. स्वप्निल शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी आभार मानले.