पुणे : पोर्शे अपघात प्रकरणामध्ये तपास अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे गुन्हे शाखा 1 चे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांची विशेष शाखा इथे बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
गुन्हे शाखा 1 पदी सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गतवर्षी (ता.3 जुलै) रोजी तांबे यांनी गुन्हे शाखा 1 च्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली होती. पुढच्या काही महिन्यात सुनील तांबे हे सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांची बदली गुन्हे शाखेवरुन विशेष शाखेत करण्यात आल्याने पोलीस दलातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तसेच, एसपी सुनील तांबे हे ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, शरद मोहोळ हत्या प्रकरण, कुरकुंब ड्रग्ज प्रकरणामध्ये तपास अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.