पुणे : प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूपच्या वतीने जुन्नर तालुक्यातील दिव्यांग व बेघर लोकांचे विविध प्रश्न सोडवणे करीता श्री गौरवभाऊ जाधव (राज्य समन्वयक प्रहार जनशक्ती, महाराष्ट्र) यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार बच्चूभाऊ कडू अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांची भेट घेतली. तसेच जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना मागिल १५ वर्षा पासून स्थानिक खासदार व आमदार ५% निधी मिळाला नाही. अनेक वेळा भेट घेऊन निवेदन दिले चर्चा झाली तरी दिव्यांगाचा ५% निधी खर्च केला नाही.
दिव्यांगांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी तालुका स्तरावर दिव्यांग समिती स्थापन करून, दिव्यांग लोकांना त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी अनेक वेळा मागणी केली होती. तसेच दिव्यांग कक्ष, घरकुल, जिल्हा परिषद कडून उदरनिर्वाह भत्ता व दुर्धर आजार याचे अनुदान, दिव्यांग लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी २०० स्केअर फुट जागा, घरपट्टीत सवलत अश्या विविध विषयांवर तसेच जुन्नर शहरातील ११०० च्यावर बेघर व दिव्यांग लोकांना जुन्नर नगर पालिकेकडून घरकुल मिळावे, म्हणून मागिल ३५ ते ४० वर्षापासून नगर पालिकेकडे मागणी करत आहे.
त्यासाठी आदोलन उपोषण , आमरण उपोषण, अनेक वेळा मुख्यमंत्रीपर्यंत निवेदन देवूनही बेघर लोकांना घरकुल मिळाले नाही. या दरम्यान अनेक उपोषण कार्यकर्त्या महीलांचा मृत्यू झाला. प्रत्येक मतदानाच्यावेळी अनेक राजकीय लोकांनी बेघर लोकांना घरकुल देवू असे अश्वासन दिले होते. परंतु कोणीही दखल घेतली नाही. या सर्व विषयांवर निवेदन देण्यात आले.
नामदार बच्चूभाऊ कडू यांनी उपस्थित सर्व दिव्यांग लोकांना व बेघर घरकुल (घरेलु कामगार) लोकांना त्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच लवकरच जुन्नर तालुका भेट देण्यासाठी येणार आहे. असे अश्वासन दिले. जुन्नर तालुक्यातील डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री जितेंद्र भाऊ बिडवई व अॅड. राजेंद्र बुट्टे पाटील यांनी बच्चूभाऊची भेट घेऊन, जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना 151 तीन चाकी सायकल वाटप केले व डिसेंट फाउंडेशन चे कार्याची माहिती दिली तसेच जुन्नर तालुका भेट दयावी म्हणून बच्चूभाऊना विनंती केली.
यावेळी राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण, अरूण शेरकर अध्यक्ष, हरी नायकोडी व केरभाऊ नायकोडी, रजनी शहा प्रहार / धुणीभांडी कामगार बेघर महीला संघटना जुन्नर तालुका गायत्री गिरी सहसचिव, उषा तेलोरे, अंजना रेंगडे, ललिता शिराळशेठ, अंजु कुटे, निर्मला सुरगुडे, मंदा शिंदे, गौरी रेंगडे अनिता महाबरे, उषा मेहेर व दिव्यांग बांधव महीला सदस्या उपस्थित होते.