पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या जीवनात आयुर्वेदाचे विशेष असे महत्त्व आहे. आयुर्वेद बालपणापासून वृद्धत्वापर्यंत निरोगी आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवते. त्यामुळे जीवन जगत असताना आयुर्वेदाचा आधार घेतल्यास नक्कीच पुढील वाटचाल सुखकर होऊ शकते. त्यात झोपेचा महत्त्वाचा वाटा असतो. जर झोपे योग्यवेळी अन् पुरेशी घेतली नाहीतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
आयुर्वेदात व्यायामालाही महत्त्व आहे. क्षमतेपेक्षा अर्धा व्यायाम करण्याचा सल्ला आयुर्वेद देते. नियमित व्यायामामुळे जठराग्नी चांगला राखण्यास मदत करे ज्यामुळे पचन आणि शौचाला नियमित होण्यास मदत होते. तसेच निवृत्तीनंतर एकाएकी काम करणे बंद केल्याने ज्येष्ठांमध्ये आपण निर्थक आहोत, ही भावना बळावू लागते. ही पोकळी छंद किंवा समविचारी लोकांच्या समूहामध्ये राहून भरून काढता येते.
यात ताजे तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करावे. पण आपली भूक लक्षात घेऊन हे करावे. जितकी भूक असेल त्यापेक्षा किंचित कमी खा. ठराविक वेळेनंतर खा, तुमच्या आहारात सहा प्रकारच्या चवींचा समावेश करा, मसालेदार, रेडी टू इट आणि डबाबंद पदार्थ खाणे टाळा, याने पुढील धोका टाळता येऊ शकतो.
शरीराचे कार्य व्यवस्थित चालावे यासाठी चांगली झोप मिळणे आवश्यक आहे. मन आणि शरीराला योग्यप्रकारे आराम दिल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे या गोष्टीकडेही लक्ष द्यावे.