पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत, देलवडी (तालुका दौंड)येथील हर्षवर्धन प्रकाश शेलार याने नेत्रदीपक यश मिळवले आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण मध्ये परीक्षेसाठी बसलेल्या ४५ हजार विद्यार्थ्यांमध्ये शेलार याने ९५ क्रमांक पटकावला आहे. साधना विद्यालय हडपसर येथे शिकत असणाऱ्या शेलार याला ३०० पैकी २२२ गुण मिळाले आहे.
हर्षवर्धन याला या परीक्षेसाठी त्याचे सर्व शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन लाभले. हर्षवर्धन याने यापूर्वी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्येही यश मिळवले होते. हर्षवर्धनच्या यशाबद्दल दौंडचे आमदार राहुल कुल, भीमा पाटस कारखान्याचे संचालक विकास शेलार, महाराष्ट्र राज्य वॉटरबेलचे प्रणेते प्रकाश शेलार, अश्विनी शेलार यांनी अभिनंदन केले आहे.