पुणे : प्रेमाचं नाटक करुन विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित महिलेसोबत प्रेमाचे नाटक करुन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महिलेने त्याला विरोध केला असता मारहाण करुन मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वडगाव शेरी आणि लोहगाव परिसरातील लॉजमध्ये घडला आहे.
याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यावरून संतोष हेमंत घोलप (वय-३५ रा. मु. पो. निगडी घोलपवाडी, ता. कराड, जि. सातारा) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी यांची फेब्रुवारी २०२२ मध्ये ओळख झाली. त्या ओळखीतून त्यांच्यामध्ये मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने महिलेसोबत प्रेमाचे नाटक करुन वडगाव शेरी व लोहगाव येथील लॉजमध्ये नेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर आरोपी संतोषच्या म्हणण्याप्रमाणे वागले नाही, तर त्याने दारु पिऊन शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.