पुणे : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्थात घरबसल्या अर्ज करता येणार आहे. यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विश्लेषणात्मक साधन ऑपरेटर या पदावर ही भरती होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 6 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.unishivaji.ac.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विश्लेषणात्मक साधन ऑपरेटर.
– एकूण रिक्त पदे : 06 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : CFC@unishivaji.ac.in