राहुल कुमार अवचट
यवत : पुणे सोलापूर महामार्गावरील यवत व उत्तरेकडील अनेक गावांना जाण्यासाठी रेल्वेचे तीन ठिकाणी भुयारी मार्ग असुन मागील काही महिन्यात यवत स्टेशन जवळील व खुटबाव कडे जाणाऱ्या रस्तांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या दोन्हींच्यामध्ये असलेल्या चोभेवस्ती येथील रस्ताचीही दुरुस्ती लवकर व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
यवत ही मोठी बाजारपेठ असल्याने दोन्ही बाजुला जोडणारा महत्त्वाच्या भुयारी रस्त्याशेजारी ओढा असल्याने अनेकवेळा पाणी साचते. या परिसरात अनेक लहान मोठ्या दगडातुन वाहन चालकांना कसरत करावी लागत असल्याने या रस्त्याला दुरुस्तीची गरज आहे.
पुलावरील काँक्रीट अक्षरश: वाहून गेले आहे. यापूर्वी अनेक दुचाकी चालक येथे घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन हा रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित करण्याची गरज व्यक्त होत आहे.