दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर शहरातील हर्षवर्धन पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने” चा लाभ महिलांना मिळावा यासाठी शनिवार (दि. 6) पासून दररोज सकाळी 10 ते 12 व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत अर्ज नोंदणीसाठी मदत कक्ष सुरु करण्यात आले आहे. तरी पात्र महिला भगिनींनी या मदत कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांनी केले आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महिला भगिनींसाठी सदर मदत कक्ष सुरु करण्यात आले आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिला, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखाच्या आतमध्ये आहे, अशा महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक, फोटो आवश्यक कागदपत्रे लागणार असल्याची माहिती देखील अंकिता पाटील-ठाकरे यांनी दिली.