जळगाव : भुसावळ शहरात एक संतापजनक घटना घडली आहे. भुसावळ शहरात साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने गैरकृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी विरोधात पोस्कोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या साडेतीन वर्षीय मुलीसोबत स्कूल व्हॅन चालकाने शाळेच्या बाहेर स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीला बसवले. त्यानंतर चिमुकलीसोबत गैरकृत्य केले.
पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा..
चिमुकली घरी आल्यानंतर पालकांच्या हा प्रकार लक्षात आला. यावेळी पालकांनी तात्काळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांनी संशयित स्कूल व्हॅनचालक प्रसाद हिरामण चौधरी यास अटक करून त्याच्या विरुद्ध पोस्कोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. चालकाला पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.